National SecurityNaxalismNews

जनजातीयांचे खरे शत्रू.. “नक्षलवादीच”..

another youth was killed by naxalites on suspicion of being a police informer

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने नक्षल्यांकडून आणखी एका तरुणाची हत्या…

गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील घटनाः १८ दिवसांत चौघांना संपविले..

आपल्या प्रभाव क्षेत्रातील लोकांवरील पकड ढिली होऊ नये म्हणून नक्षलवाद्यांनी मग हत्यासत्र वाढवले आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या दहशतीतून तरी लोक सोबत राहतील हा हेतू त्यामागे होता,पण घडतेय मात्र उलटेच,प्रारंभी त्यांच्यासोबत असलेले जनजातीय (वनवासी) आता त्यांच्यापासून दूर जाऊ लागले आहेत, चळवळीचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातून होत असलेले लोकांचे स्थलांतर व शिक्षण तसेच नोकरीसाठी आग्रही असलेली तरुण पिढ़ी बघितली की, हा विश्वासार्हता गमवण्याचा मुद्दा आणखीनच स्पष्ट होतो.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून क्रूर हत्यासत्र काही केल्या थांबायला तयार नाही. दक्षिण गडचिरोलीत तीन तरुणांची हत्या केल्यानंतर आता नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा उत्तर गडचिरोलीकडे वळवला आहे. नक्षलवाद्यांनी २ डिसेंबरच्या रात्री पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने एका तरुणाची गळा आवळून हत्या करत पत्रक जारी केले आहे. विशेष म्हणजे मयत तरुण एकेकाळी नक्षल्यांसाठीच काम करत होता. आपल्याच कार्यकर्त्याची निर्घृण हत्या फक्त राष्ट्रद्रोही नक्षलीच करू शकतात.

People’s Liberation Guerrilla Army.. (PLGA)

People's Liberation Guerrilla Army.. (PLGA)

नक्षल्यांचे सशस्त्र संघटन पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (PLGA) स्थापना दिनानिमित्त नक्षलवादी दरवर्षी २ ते ८ डिसेंबरदरम्यान ‘पीएलजीए’ सप्ताह पाळतात. यादरम्यान ते क्रूर हिंसक कारवाया करतात. त्यामुळे गडचिरोलीच्या नक्षलप्रभावित क्षेत्रात या काळात दहशतीचे वातावरण असते. २ तारखेला ‘पीएलजीए’ सप्ताहाचा पहिलाच दिवशी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्ली जवळ बॅनर लावले. यात त्यांनी हा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले होते. सोबतच पोलीस यंत्रणेला गंभीर इशारा देखील दिला होता.

‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २ डिसेंबरच्या भामरागड तालुक्यात बॅनर व पत्रके टाकल्यानंतर मध्यरात्री नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील मुरकुटी येथील चमरा मडावी (३८) याची गळा आवळून हत्या करण्यात आली. तो पोलिस खबरी असल्याचा संशय नक्षल्यांनी मृतदेहाजवळ टाकलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे. चमरा हा पोलिस खबरी असून नक्षल्यांच्या नावावर त्याने अनेकांकडून पैसे गोळा केल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, “चमरा मडावी हा नक्षल्यांचा समर्थक होता. दारूगोळा पुरवठा करण्यासाठी त्याने नक्षल्यांकडून मोठी रक्कम घेतल्याने त्याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे”. अधिक तपासानंतर नेमके कारण समजेल असे त्यांनी सांगितले.

चमराची बहीण, मेहुणाही नक्षल चळवळीत २०२१ साली चमरा मडावी यास नक्षल्यांना बंदुकीच्या गोळ्या पुरवठा करण्याचा तयारीत असताना छत्तीसगडमधील बालाघाट जिल्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. त्याची बहीण जहाल नक्षलवादी डीव्हीसी मानसिंग होळी याची पत्नी असून ती सुद्धा नक्षल्यांच्या ‘एमएमसी’ झोनमध्ये विस्तार प्लाटून ३ मध्ये कार्यरत आहे.

असे घडले हत्यासत्र…

१५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे याची गोळ्या झाडून हत्या केली होती, २३ नोव्हेंबरला टिटोळा (ता. एटापल्ली) येथे पोलिस पाटील लालसू वेडदा यांना संपविण्यात आले. २४ नोव्हेंबरला कापेवंचा (ता. अहेरी) येथे रामजी आत्राम याची हत्या झाली तर २ डिसेंबरच्या रात्री चमरा मडावी (रा. मुरकुटी ता. कोरची) याचा नक्षल्यांनी खून केला.

चारही हत्या पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून झाल्या असून नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या या घटनांनी जिल्हा हादरुन गेला आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून नक्षल प्रभावित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोलीस जवानांना तैनात करण्यात आले आहे. सप्ताहात नक्षल्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी गडचिरोली पोलीस ड्रोनसारख्या आधुनिक उपकरणाची मदत घेत आहे. सोबतच नक्षलविरोधी पथकाचे (C-६०) अभियान अधिक गतीने राबविण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

नक्षलवादाच्या या चळवळीने तिची ६ दशके पूर्ण झाल्यानंतरही लोककल्याणासाठी भक्कम असा पर्याय उपलब्ध करून देण्यात ही चळवळ सपशेल अपयशी ठरली आहे. फक्त ६० वर्षांतच नक्षलवाद्यांनी अतिहिंसाचारामुळे आपली विश्वासार्हता गमावली आहे.

हा आपला भारत देश लाखो भारतीयांच्या बलिदानातून उभा राहिलेला आहे. हजारो क्रांतीकारकांच्या त्यागातून हा देश स्वतंत्र झालेला आहे. शेवटपर्यंत प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाची अखंडता आणि देशाचे वैभव कसे टिकून राहील याबाबत अधिक जागरूक राहून येत्या काळात समाजात सामाजिक स्वास्थ्य व सुरक्षेसाठी आपल्याला अधिक तत्पर रहावे लागेल.

https://www.loksatta.com/nagpur/on-the-very-first-day-of-the-plga-week-the-naxalites-put-up-a-banner-near-middapalli-in-bhamragarh-taluka-warning-ssp-89-ssb-93-4077675/

https://www.lokmat.com/gadchiroli/another-youth-was-killed-by-naxalites-on-suspicion-of-being-a-police-informer-a-a797-c601/

Back to top button