जर, सत्य असत्याचा निवाडा करणारे न्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य प्रजेने कोणाकडे पहावे..
एखादा खोटा गुन्हा दाखल झाल्यावर त्याचे काय विपरीत परिणाम होतात, याचं एक उदाहरण हिंदू न्यायधीशावर झालेल्या बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यातून समाजासमोर आलं आहे.
संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निकालानंतर संबंध महाराष्ट्रात (Maharashtra) खळबळ उडाली आहे.या निकालात न्यायाधीशालाच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याच्या प्रकरणात राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाने दोन विद्यमान वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यासह तीन निवृत्त पोलिस अधिकान्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. पाच जणांविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करा आणि दखलपात्र गुन्हा असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच्याविरोधात गुन्हा (एफआयआर) नोंदवा असे निर्देश न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीहरी डावरे व सदस्य उमाकांत मिटकर याच्या खंडपीठाने आपल्या निकालात दिले आहेत.
अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे व्यवस्थापकीय संचालक राजवर्धन सिंह व दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल कुभारे या २ वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्यासह सेवानिवृत्त तत्कालीन पोलिस निरीक्षक तडवी, उपविभागीय पोलिस अधिकारी ए एस पवळ, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी निवाळकर यांच्यावर कारवाईचे आदेश राज्य सरकारला दिल्याने कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या प्रशासनाला जाग आली आहे
काय घडले त्या दिवशी…
तत्कालीन दिवाणी न्यायाधीश बाळासाहेब हिरालाल भारस्कर हे १७ वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबीयांसोबत गोदावरी विश्रामगृहात तात्पुरते राहत असताना ७ मार्च २००५ रोजी त्यांच्या बाबतीत हा हृदयद्रावक प्रकार घडला होता.
झाले असे की, विश्रामगृहाच्या पहिल्या मजल्यावरून अचानक आरडाओरड ऐकू आल्यानंतर भारस्कर तिथे काय घडले ते बघायला गेले असता, ४-५ धर्मांध मुस्लिम तरुण नूर जहाँ या बुरखाधारी महिलेला बेदम मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य सहिष्णू हिंदू म्हणून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुस्लिम तरुणांनी भारस्कर यांनाच जोरदार मारहाण सुरू केली. नंतर भारस्कर यांना धर्मांध,जिहादी (jihadi) मुसलमानांनी रेस्ट हाऊसमधून जबरदस्तीने पकडून मदरश्यात नेले व सांगीतले की ॲडव्होकेट नूर जहाँ या महिलेबरोबर तुमचे अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे तिच्यासोबत निकाह करावा लागेल तसेच इस्लाम पंथ कबूल करावा लागेल अशी धमकी जिहाद्यांनी दिली. त्यावेळी भारस्कर यांनी त्याला जोरदार विरोध केला. इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार देत त्यांनी सांगितले की हे सर्व खोटं आहे. मी असे कृत्य केलेले नाही. त्यावेळी न्यायाधीश भारस्कर यांना मदरशात जोरदार मारहाण देखील करण्यात आली.त्यानंतर भारस्कर यांच्यावर संशय घेत बलात्काराचा खोटा आरोप लावून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याची भीती दाखवण्यात आली.
मदरश्याबाहेर As usual जिहादी मुस्लिम जमाव मोठ्याप्रमाणात जमल्याने पोलिसही मोठ्या प्रमाणात तेथे पोहोचले. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाईची आश्वासन दिले, त्यानंतर धर्मांध जिहादी मुसलमानांनी महिलेला भारस्कर यांच्याविरोधात खोटी FIR नोंदवण्यास भाग पाडण्यात आले. “मी न्यायाधीश आहे, माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटा आहे. न्यायाधीशाला अटक करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचेही पालन झालेले नाही, असे भारस्कर यांनी निदर्शनास आणूनही पोलिसांनी त्याकडे जाणीवपूर्वक,हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले.”
FIR साठी दबाव –
बाळासाहेब भारस्कर यांचा काहीच गुन्हा नाही आणि त्यांनी मला काहीच त्रास दिलेला नाही, असे खुद्द फिर्यादी नूर जहाँ महिलेने सांगूनही तिच्यावर FIR साठीदबाव टाकण्यात आला. तिच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झालाच नसल्याचे स्पष्ट झाले, तिने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयातील भारस्कर यांच्या याचिकेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. इतकेच नव्हे तर खुद्द पोलिसांनीच नंतर कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नसल्याचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर मान्य केले. विश्रामगृहातील खानसामा रवींद्र शिंदेनेही भारस्कर यांच्याच बाजूने जबाब नोंदवला.
अखेर सत्याचा विजय झाला –
या साऱ्याची घटनेची तपासणी करून उच्च न्यायालयाने ३ मे २०१७ रोजी भारस्कर यांना पूर्णपणे आरोपमुक्त केले. इतकेच नव्हे तर या साऱ्या धक्कादायक प्रकाराने भारस्कर यांचे करिअर नाहक उद्ध्वस्त झाले ‘असे निरीक्षणही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी निर्णयात नोंदवले.
या घटनेमुळे भारस्कर यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले. त्यांना न्यायाधीश पदावरून देखील बेदखल करण्यात आलं. ज्या गावात ते राहत होते ते गाव सोडून वणवण करून भिवंडी येथे यावं लागलं आणि अनेक दिवस आपली ओळख लपून रहावे लागले. मुलांच्या शिक्षणाच देखील अतोनात नुकसान झालं. अनेक नरक यातना न्यायाधीश असून सहन कराव्या लागल्या मात्र या संपूर्ण प्रकरणात आपण लढत राहणार व सत्य समोर आणणार अशी जिद्द भारस्कर यांनी बाळगली होती. त्याचा परिणाम म्हणजे हायकोर्टाने २०१७ मध्ये त्यांना बलात्काराच्या खोटा गुन्ह्यातून दोष मुक्त करण्यात आलं.
वरील हृदयद्रावक बातमी वाचून कोणाचेही मन द्रवल्याशिवाय राहणार नाही. धर्मांध,जिहादी मुसलमानांची वाढती पिलावळ कायदा, संविधान,कोर्ट यांना अजिबात जुमानत नाही त्यांना हवाय फक्त “शरिया” ..
जिथे न्यायाधीशालाच खोट्या प्रकरणात अडकवले जात असेल तेथे सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे पहावे ?.. असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सकल हिंदू समाजाने गाढ निद्रेतून जागे व्हायची वेळ आली आहे हे मात्र निश्चित..
शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की:-
भूल मत हर एक हिन्दू शेर है
कुछ और नही बस हिंदुओं के
दहाड़ने की देर है..