
महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित १३ महानुभावांचा अल्प परिचय सांगणारी १३ भागांची विशेष मालिका..
पद्मभूषण
दिग्दर्शक राजदत्त

दत्तात्रय अंबादास मायाळू – हे गेल्या चार दशकांपासून मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ते “राजदत्त” या नावाने प्रसिद्ध आहे. राजा परांजपे यांच्या नावावरचा ‘राज’ आणि त्यांच्या स्वतःच्या नावावर ‘दत्त’ या दोन शब्दांचा मिलाफ करून राजदत्त हे नाव त्यांनी घेतले.
राजदत्त यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे झाला. त्यांनी कुसुमाग्रजांच्या ‘दुव्याचे दिवे’, आचार्य अत्रे यांच्या ‘उद्याचा संसार’ आणि ‘सस्तांग नमस्कार’ या चित्रपटांत त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या. त्यांनी जगन्नाथराव जोशी यांच्या प्रेरणेने त्यांनी गोवा मुक्ती चळवळीत भाग घेतला. सुरुवातीला त्यांनी केसरीच्या कार्यालयात ठिय्या मांडला. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष सत्याग्रह आंदोलनात भाग घेतला.
क्रमशः