HinduismNewsWorld

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांना वाली कोण ??? भाग १..

indian student brutally killed by homeless man in georgia usa

अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची व्यथा मांडणारी २ भागांची विशेष मालिका..

शीर्षक वाचून गोंधळून गेलात ना पण हे खरंय.. मागील फक्त ३० दिवसात ७ भारतीय विद्यार्थ्यांचा महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला आहे.इतकेच नव्हे तर मागील वर्षात जवळपास ३० भारतीय विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे..

भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्या, मृत्यू मागील ढळढळीत सत्य म्हणजे अमेरिकेतील वर्णद्वेष..

गेल्या काही दिवसातील हृदयद्रावक घटना,बातम्या पुढील प्रमाणे..

{१५ जानेवारी} दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची मोठी संख्या आहे. असेच दोन विद्यार्थी हे दोन आठवड्यापूर्वी अमेरिकेत शिक्षणासाठी गेले होते. मात्र, अमेरिकेतील कनेक्टिकटमध्ये त्यांच्या संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे. हे विद्यार्थी अभ्यासासाठी १६ दिवसांपूर्वीच अमेरिकेत पोहोचले होते. दोन्ही विद्यार्थी एकाच खोलीत राहत होते. दरम्यान, झोपेत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

एका विद्यार्थ्याचे नाव गट्टू निदेश असून तो तेलंगणातील वानापर्थी येथील मुळ राहणारा आहे. तर दुसऱ्या विद्यार्थ्याचे नाव श्रीकाकुलम असे आहे. तो आंध्र प्रदेशचा येथील रहिवासी होता. दिनेशचे वडील गहू व्यंकटण्णा यांनी दोघांचाही मृत्यू कार्बन मोनोऑक्साइडच्या विषबाधेमुळे झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे.

श्रीकाकुलम

दरम्यान, दोघांच्या मृत्यू बाबत अमेरिकन प्रशासनाकडून कोणतेही माहिती अथवा विधान करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दिनेशच्या काकांनी सांगितले की, शेजारी राहणारे त्याचे मित्र जेव्हा त्याच्या खोलीत पोहोचले आणि त्यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते दोघांनीही प्रतिसाद दिला नाही. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत रुग्णवाहिका देखील मागवली. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

दिनेशने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केले आहे. यानंटर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कनेक्टिकटच्या सेक्रेड हार्ट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता. त्याचे शालेय शिक्षण महबूबनगर येथून झाले आणि नंतर हैदराबादला जाऊन इंटरमिजिएट पूर्ण केले. साईनाथच्या म्हणण्यानुसार, त्याचे कुटुंबीय दिनेशला हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावर सोडण्यासाठी आले होते. मात्र, दोन आठवड्यात त्यांच्या मृत्यूची बातमी आल्याने दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

{१ फेब्रुवारी} अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे सत्र थांबेना; एकाच आठवड्यात तीन मृत्यू

अमेरिकेच्या सिनसिनाटी राज्यात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आठवड्याभरात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. मागच्या आठवड्यात २५ वर्षीय विवेक सैनीची एका बेघर व्यक्तीने हातोडीने वार करून हत्या केली होती. सैनीने नुकतेच एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. जूलियन फॉकनर नावाच्या बेघर आणि नशेखोर व्यक्तीने सैनीची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे सैनीने या बेघर व्यक्तीला आश्रय देऊन, खाऊ-पिऊ घातले होते.

विवेक सैनी

नील आचार्य नावाचा आणखी एक भारतीय विद्यार्थी मागच्या आठवड्यात मृत्यूमुखी पडला. इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठात नील शिक्षण घेत होता. पर्ड्यू विद्यापीठातील जॉन मार्टिसन होनर्स महाविद्यालयातून त्याने कम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्समध्ये पदवी घेतली होती. रविवारी तो बेपत्ता झाल्याचे समोर आले आणि त्यानंतर सोमवारी त्याचा मृतदेह आढळून आला.

नील आचार्य

मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात २६ वर्षीय आदित्य अदलखाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. भारतात वैद्यकीय शिक्षण घेऊन अमेरिकेच्या सिनसिनाटी वि्दयापीठात शिक्षण घेत असलेल्या आदित्यचा ओहियो राज्यात खून झाला होता. गाडीत बसलेला असताना त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. आण्विक आणि विकासात्मक जीवशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी आदित्य अमेरिकेत गेला होता.

आदित्य अदलखा

आणखी एका प्रकरणात इलिनॉय विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय अकुल धवन विद्यार्थ्याचा जानेवारी महिन्यात मृत्यू झाला होता. धवन त्याच्या खोलीतून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी घराबाहेर उणे १७ अंश सेल्सियस इतके भयानक तापमान असताना अकुल बेपत्ता झाला होता. इलिनॉय विद्यापीठाच्या संकुलातच त्याचा मृतदेह आढळून आला होता.

{ ८ फेब्रुवारी } अमेरिका में एक और भारतीय युवक की मौत, २३ साल के छात्र की जंगल में मिली लाश!

अमेरिका में भारतीय युवाओं की मौत का मामला थमने का नाम नहीं ले रहा है. हाल ही में 23 साल के समीर कामत (Sameer Kamath) की मौत ने सभी को हिलाकर रख दिया है. उनका शव जंगल में मिला, जिसके बाद अमेरिका (Indian students death USA) के वॉरेन काउंटी की पुलिस जांच में जुट गई है. साल २०२४ में ये भारतीय छात्रों पर हमले का सातवां मामला बताया जा रहा है, जिसमें छात्र की मौत हुई है.

फर्स्टपोस्ट की रिपोर्ट के अनुसार समीर की लाश रोमवार शाम को निशेज़ लैंड ट्रस्ट के जंगल मं पड़ी मिली जो एक नेचर रिजर्व है. बीते 2 हफ्तों में ये 4 भारतीय छात्र की मौत का मामला है. पुलिस के द्वारा जारी बयान में बताया गया कि लाश शाम के ५ बजे बरामद हुई है. लड़के के परिवार को उसकी मौत के बारे में सूचना दे दी गई है. लड़के की मौत के बाद पुलिस ने लोगों को समझाया है कि जनता को डरने की जरूरत नहीं है.

के समीर कामत

डॉक्टरेट का छात्र था समीर

आपको बता दें कि समीर कामत एक अमेरिकी नागरिक था जो भारतीय मूल का था. वो मैसेचुसेट्स का रहने वाला था. Purdue विश्वविद्यालय में मेकैनिकल इंजीनियरिंग विभाग का डॉक्टरेट का छात्र था. उसने यूनिवर्सिटी ऑफ मैसेचुसेट्स से मेकैनिकल इंजीनियरिंग में अपनी बैचलर्स डिग्री हासिल की थी और २०२१ की गर्मियों में Purdue यूनिवर्सिटी पढ़ने आया था. अगस्त २०२३ में उसने यहीं से मेकैनिकल इंजीनियरिंग में अपनी मास्टर्स डिग्री हासिल की थी और २०२५ में अपने डॉक्टोरल प्रोग्राम को भी वो पूरा करने वाला था.

इस साल सामने आए मौत के कई मामले

रिपोर्ट के अनुसार पिछले हफ्ते श्रेयस रेड्डी बेनिगर नाम के एक छात्र की ओहियो में मौत हुई थी जो लिंडर स्कूल ऑफ बिजनेस का छात्र था. प्रशासन ने नफरत में की गई हत्या की संभावनाओं को खारिज किया है. आपको बता दें कि इसी साल 30 जनवरी को Purdue विश्वविद्यालय के एक और छात्र नील आचार्य की भी मौत हुई थी जो पहले लापता हो गया था. विवेक सैनी नाम के एक छात्र की भी 29 जनवरी को एक हमले में मौत हो गई थी.

क्रमशः

संदर्भ :-

https://www.loksatta.com/desh-videsh/indian-student-found-dead-in-cincinnati-third-in-us-in-a-week-kvg-85-4189088/

https://marathi.hindustantimes.com/nation-and-world/6-dead-250-injured-in-uttarakhand-violence-curfew-imposed-schools-shut-141707452369944.html

https://www.loksatta.com/desh-videsh/indian-student-brutally-killed-by-homeless-man-in-georgia-us-after-sheltering-him-for-few-days-asc-95-4182927/

https://hindi.news18.com/news/world/23-year-old-indian-origin-american-student-found-dead-purdue-university-usa-8051608.html

https://www.bhaskar.com/international/news/another-indian-student-shreyas-reddy-beniger-dies-in-america-132530992.html

Back to top button