अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची व्यथा मांडणारी २ भागांची विशेष मालिका..
भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्या, मृत्यू मागील ढळढळीत सत्य म्हणजे अमेरिकेतील वर्णद्वेष..
{ २७ जानेवारी } अमेरिका में एक और भारतीय छात्र की मौत:वजह साफ नहीं;
अमेरिका के ओहायो में एक भारतीय छात्र श्रेयस रेड्डी की मौत हो गई। हालांकि, मौत कहां और कैसे हुई इससे जुड़ी जानकारी सामने नहीं आई है।
श्रेयस रेड्डी बेनिगर
न्यूयॉर्क स्थित भारतीय कॉन्सुलेट ने श्रेयस की मौत के बारे में जानकारी देते हुए कहा- श्रेयस रेड्डी बेनिगर बिजनेस की पढ़ाई कर रहा था। उसकी मौत की खबर से दुखी हैं। इस मामले में पुलिस की जांच चल रही है। मारे गए छात्र के पेरेंट्स से भी संपर्क किया गया है।
अमेरिकेतील वर्णद्वेषसुद्धा भारतीयांविरुद्धच्या द्वेषाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. कट्टरपंथी रिपब्लिकन पक्षाचे गड असलेल्या जॉर्जिया, अलाबामा आणि इंडियाना या राज्यांत भारतीय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. श्वेत वर्णद्वेषी येथे सक्रिय आहेत. २०२२ या एका वर्षात द्वेषपूर्ण गुन्हे व भारतीयांवरील हल्ल्यांच्या घटना ५२० हून अधिक झाल्या. तर गेल्या वर्षी २०२३ मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषाच्या गुन्ह्यांची संख्या ३७५ एवढी होती.
अद्याप अटक नाही…
श्रेयस रेड्डी बेनिगेरी, विवेक सैनी आणि नील आचार्य या भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकेत एका आठवड्यात हत्या झाल्या आहेत. याआधी अकुल धवनची हत्या झाली आहे. वेगवेगळ्या राज्यांत घडलेल्या घटनांमध्ये एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.
जान्हवी
इलिनॉयमध्ये राहणारी अनिशा शाह सांगते की, पोलिसांचा दृष्टिकोन अतिशय अमानवी आहे. भारतीयांनी द्वेषाच्या गुन्ह्यांची तक्रार केली तरी अनेकदा पोलिस घटनास्थळी पोहोचत नाहीत. अनिशा म्हणते की, गेल्या वर्षी सिएटलमध्ये जान्हवीला कारने चिरडून मारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने निर्लज्जपणे म्हटले होते ‘जर एखाद्या भारतीयाचा मृत्यू झाला तर सरकार नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपये देईल.’
‘भारतीयाचा जीव गेला, सरकार देणार १० लाख भरपाई’
अमेरिकेतील असुरक्षित भागात राहणारे भारतीय विद्यार्थी गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट बनत आहेत. २०२३ या वर्षभरात अमेरिकेत ३० भारतीय विद्यार्थ्यांची हत्या झाली. २०२४ च्या सुरुवातीला ७ विद्यार्थ्यांची हत्या झाली. २०२२ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची १२ प्रकरणे नोंदवली गेली होती .
अमेरिकेत हिंदूंविरुद्ध द्वेष पसरवण्याचे षडयंत्र; २०२२ मध्ये सोशल मीडियावर हिंदू धर्माविरोधात ४०% ट्विट वाढले..
अमेरिकेत गेल्या काही वर्षांत हिंदू धर्म आणि हिंदूंविरुद्ध द्वेष मोठ्या प्रमाणात पसरवला जात आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. हा कट असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
रटगर्स युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या अभ्यासात ऑनलाइन हिंदुविरोधी लक्ष्ये ओळखली गेली. यावरून हिंदूंच्या पवित्र प्रतीकांची, प्रथा यांची जाणीवपूर्वक आणि चुकीच्या पद्धतीने बदनामी केली जात असल्याचे दिसून आले. भगवा रंग, स्वस्तिक, टिळा किंवा बिंदीसह इतर चिन्हे अपमानास्पद रीतीने वापरली जातात.
नेटवर्क कॉन्टेजिअन रिसर्च इन्स्टिट्यूट (NCRI) ला टेलिग्राम, टिकटॉक आणि गॅबसह सोशल मीडियावर हिंदूंबद्दल अपमानास्पद पोस्ट्समध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. ट्विटरवर हिंदुविरोधी मीम्स, हॅशटॅग आणि घोषणांचा प्रसार होत आहे.
एआयद्वारे २०२२ मध्ये हिंदूंविरुद्ध द्वेषाचे ट्वीट..
-नेटवर्क कॉन्टॅगियन रिसर्च इन्स्टिट्यूटने(एनसीआरआय) टेलिग्राम, टिकटॉक आणि गॅबसह अन्य सोशल मीडियात हिंदूंबाबत अवमानकारक पोस्टमधील वाढीचा शोध लावला.
-१० लाखांवरील ट्वीट्सच्या तपासणीत दिसले की, इराणी ट्रोल्सने हिंदूंवर भारतात मुस्लिमांचा नरसंहार करण्याच्या प्रयत्नात हिंदू विरोधी परंपरावादाचा प्रचार केला.
-२०२२ मध्ये टि्वटरवर हॅशटॅगसह हिंदू घृणा निर्माण केली.
-“पजीत’ शब्द हिंदूंविरुद्ध जातीवाचक शिवीच्या रूपात वापरली जाते.
-टिकटॉकवर “पजीत’ व्हिडिओ २९ लाख वेळा पाहिला आहे.
हिंदु फोबिया म्हणजे काय?
हिंदु धर्माविषयी लोकांच्या मनात खोटे भय ,खोटी दहशतीची भावना निर्माण करणे म्हणजे हिंदू फोबिया निर्माण करणे होय. हा शब्द हिंदू धर्म विरोधी लोकांकडुन हिंदू धर्माला अणि हिंदू धर्मातील संस्कृती जीवनशैली इत्यादी गोष्टींना लक्ष्य करण्यासाठी प्रामुख्याने वापरला जात आहे. हिंदू धर्माला एक कट्टर हिंसावादी अणि असहिष्णू धर्म म्हणून जगासमोर सिदध करायला, हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी काही समाजकंटक प्रयत्न करीत आहे.आपले हे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी समाजकंटकांकडून जागोजागी देशात तसेच परदेशात हा खोटा हिंदू फोबिया निर्माण केला जात आहे.
अमेरिकेत ३३ लाखांहून अधिक हिंदू..
अमेरिकेत ३३ लाखांहून अधिक हिंदू आहेत. सुमारे ९०% अमेरिकन हिंदू स्थलांतरित आणि स्थलांतरितांची मुले आहेत. इतर १०% लोक धर्म सोडून हिंदू झाले आहेत. तेथील विकासात हिंदूंचे योगदान इतर कोणत्याही समुदायापेक्षा जास्त आहे, जे एकूण लोकसंख्येच्या फक्त १% आहे.
भारतीय विद्यार्थी अनेकदा शहरातील तुलनेने स्वस्त अश्या असुरक्षित भागात भाड्याने राहतात. मॉल्स, दुकानांत अर्धवेळ काम करतात. जॉर्जिया, अलाबामा, आर्कान्सा व इंडियानासारख्या उच्च गुन्हेगारी दराच्या राज्यांमध्ये भारतीय विद्यार्थी ड्रग डीलर आणि इतर गुन्हेगारांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरतात. काही पैशांसाठी गुन्हेगार भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला करत आहेत.
अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय मुले ही शिक्षण घेण्यासाठी जात असतात. येथील मोठ्या विद्यापीठात प्रवेश घेऊन चांगल्या नोकरीच्या संधी देखील ही मुले शोधत असतात. मात्र, या प्रकारच्या घटनेमुळे अमेरिकेत गेलेल्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
समाप्त..
संदर्भ :-