News

महाराष्ट्राच्या दिंडीचे वारकरी.. पद्म पुरस्काराचे मानकरी.. भाग १३

padma-awards 2024 Maharashtra

महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित १३ महानुभावांचा अल्प परिचय सांगणारी १३ भागांची विशेष मालिका..

पद्मश्री पुरस्कार..

गोवा

कुळागर फुलवणाऱ्या गोव्याच्या शेतकऱ्याला पद्मश्री सन्मान

संजय अनंत पाटील (शेती)…

फोंडा तालुक्यातील शिलवाडा सावईवेरे येथील शेतकरी संजय पाटील यांना पद्मश्री जाहीर झाल्याची माहिती मिळतेय. पाटील यांनी आपल्या कुळागरात किलोमीटरपेक्षा जास्त लांब भुयारे मारुन डोंगरावरुन पाणी आणण्याची किमया केली आहे.

त्यांच्या या कार्याची शासनाने दखल घेऊन शासनाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केलाय. काही काळापूर्वी संजय पाटील यांनी शेती बागायती (कुळागर) हाच उत्पन्नाचा मार्ग ठरवत बागायतीत राबायचे निश्चीत केले.

मात्र मान्सून वगळता शेती, बागायतीत राबणाऱ्या पाटील यांना पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवू लागले होते. याच दरम्यान बागायती शेजारच्या डोंगरावर पाणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.काहीही झालं तरी बागायती फुलवायचीच या निश्चयाच्या जोरावर त्यांनी आपल्या बागायती पासून लगतच्या त्या डोंगरापर्यन्त जमिनीतून भुयारं तयार करायला सुरुवात केली.

काम कठीण आणि जोखमीचे होते. मात्र पाटील यांच्या निययोजनबद्ध आराखड्यामुळे त्यांनी काही काळातच डोंगरावरील पाणी भुयाराच्या माध्यमातून झिरपत झिरपत आपल्या शेती, बागायतीत आणले.त्याच्या या कर्तबगारीची दखल घेऊन शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांनी “गेल्या 35 वर्षांचे श्रम फळाले आले, मला मिळालेला सन्मान हा गोव्यातील तमाम शेतकऱ्यांचा सन्मान आहे” अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

गोव्यातील बहुतांश ग्रामीण भागातील लोकांचा उत्पन्नाचा मार्ग हा शेती बागायती असून बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना पाण्याची समस्या भेडसावत असते. केवळ पाण्याअभावी कित्येकांनी शेती- बागायतींचे उत्पन्न सोडल्याचे समोर आले आहे. मात्र संजय पाटील यांची ही यशोगाथा शेती- बागायती करणाऱ्या नवीन आणि होतकरू पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

वरील सन्माननीय,कर्तृत्ववान लोकांची माहिती वाचल्यावर आपल्या लक्षात आलेच असेल की, आता पद्म पुरस्कार कर्तृत्वावरच मिळतो वशिल्यावर नाही..

समाप्त..

Back to top button