IslamNews

‘कथा एक प्रत्यावर्तनाची’

‘कथा एक प्रत्यावर्तनाची’ या पुस्तकाचे प्रकाशन 14 जुलै 2024 रोजी लेडी रमाबाई हॉल, पुणे येथे करण्यात आले.

हे पुस्तक आर्ष विद्या समाजमच्या पहिल्या महिला प्रचारिका ओ श्रुती यांनी लिहिलेल्या ‘ओरु परवर्तनतिंटे कथा’ या मल्याळममधील मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे.

राज्यसभेच्या माननीय खासदार डॉ. श्रीमती मेधा कुलकर्णी जी आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक, पद्मश्री गिरीश प्रभुणे जी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

आर्ष विद्या समाजमचे संस्थापक आणि संचालक आचार्यश्री के.आर.मनोज जी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या भाषणात आचार्य जी यांनी स्वकियांवर आणि समाजावर विपरित परिणाम करणाऱया मन व विचार परिवर्तन पद्धतींवर म्हणजेच प्रमुख ब्रेनवॉशिंग स्ट्रटेजीजवर भर दिला, त्याचा प्रतिकार कसा केला पाहिजे आणि आर्ष विद्या समाजम् त्यासाठी योजत असलेल्या उपायांवर भर दिला.

प्रमुख पाहुणे डॉ. मेधा कुलकर्णी जी, पद्मश्री गिरीश प्रभुणे जी, श्री उत्तम कुमार जी (संयोजक, केरळ सेल, महाराष्ट्र आणि प्रतिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष), आणि श्रीमती शेफाली वैद्य जी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

सूत्रसंचालन श्री. दयानंद बंडगर यांनी केले. श्री. आनंद रायचूर जी (कर्नाटक येथील बजरंग दल कार्यकर्ता) यांनी स्वागतपर भाषण केले आणि श्रीमती मधुरा इनामदार थिटे (धर्म जागरण, पार्वती जिल्हा सह संयुक्तिका) यांनी आभार मानले.

श्री ए आर नायर जी आणि श्री जे ए थेरगावकर यांनी संयुक्तपणे मराठीत अनुवादित केलेल्या या पुस्तकाचा परिचय विशाली शेट्टी (पूर्णवेळ प्रचारिका, आर्ष विद्या समाज) यांनी करुन दिला.

प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिका ओ श्रुती यांनी पुस्तक, त्यांना आलेले अनुभव आणि धर्मांतरांबद्दल जागरूकता पसरवण्याची आणि लोकांना सनातन धर्माच्या योग्य मार्गावर आणण्याची गरज या विषयावर विवेचन केले.

अनघा, अनुषा, अमृता या बहिणींनी त्यांचा इस्लाम स्वीकारल्याचा अनुभव सांगितला, ज्याचा अनघावर परिणाम झाला आणि या घटनेचा तिच्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर कसा परिणाम झाला, हा अनुभव सांगितला.

सांस्कृतिक गीत आणि नृत्य सादरीकरणाने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

बौद्धकम बुक्स अँड पब्लिकेशन्स, हर घर सावरकर ट्रस्ट पुणे, मृत्युंजय प्रकाशन, सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ष विद्या समाजम ने या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी:

https://arshaworld.org/…/katha-eka-pratyavarthanachi/

किंवा मोठ्या प्रमाणात ऑर्डरसाठी कॉल करा: 073566 13488

Back to top button