IslamNews

विशाळगडाच्या निमित्ताने…

Anti-encroachment drive at Vishalgad fort

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर असे तू हिमाचल पसरलेल्या संपूर्ण हिंदू राष्ट्रातील राष्ट्रभक्तांसाठी जगण्याचा प्रेरणा मंत्र आहे. सतराव्या शतकामध्ये ज्यावेळेस संपूर्ण भारत वर्षाला मुघल सत्तांनी विळखा घातलेला होता, परकीय परधर्मीय आक्रमकांच्या धार्मिक अत्याचारांनी संपूर्ण देशभर उच्छाद मांडलेला होता.

संपूर्ण रयत त्राही त्राही होऊन गेली होती, गलित गात्र झालेली होती, स्वाभिमान शून्य झालेली होती, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अभिमानशून्य समाजातील स्वाभिमान, धर्माभिमान, राष्ट्राभिमान जागृत केला. आणि मग सामान्य लोकांनी असामान्य पराक्रम करून दाखवला. या सहकाऱ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू पदपादशाहीची स्थापना केली. त्यांच्या या संघर्षास सर्वाधिक मदत झाली ती या सह्याद्रीची. सह्याद्रीच्या अंगाखांदयावर असणाऱ्या दुर्गांची. शिवरायांच्या पदरी असलेल्या रामचंद्र अमात्यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्र‘ या अद्वितीय ग्रंथात ते म्हणतात, ‘गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ .. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’.

एकेकाळी स्वराज्याचे आणि आता इतिहासाचे हे ‘सार’च आज अधोगतीला लागले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात साडेतीनशे हून अधिक किल्ले आहेत. पैकी किमान सत्तर पेक्षा जास्त किल्ल्यांवर अनधिकृत बांधकामे झालेली आढळतात. ही बांधकामे एका विशिष्ट धर्माचीच आढळतात.

कधीतरी या दुर्गम असलेल्या किल्ल्यावर दहा-वीस दगड एकत्र करून त्यावर हिरवी चादर पांघरायची. काही दिवसांनी त्या चादरीच्या खाली थडगे सदृश्य बांधकाम करायचे. त्या थडग्याचा कुणीतरी पीर बनवायचा त्याची प्रसिद्धी करायची. हळूहळू त्यात थडग्याला दर्ग्यात रूपांतरित करायचं. आणि मग तिथे वस्ती वसवायची. त्या पीर बाबाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची सोय म्हणून लॉज उभे करायचे. दारू मटणाच्या पार्ट्या, जुगाराचे अड्डे आणि नाही नाही ते अनैतिक धंदे तिथे करायचे. वेळप्रसंगी राष्ट्रद्रोह्याना त्या ठिकाणी आश्रय ही द्यायचा. आज ही एक मोड्स ऑपरेंडी देशविघातक शक्तींकडून राबवली जातेय. किल्ले विशाळगड हे त्याचे जितं जागतं उदाहरण आहे. सरकारी भाषेत कदाचित याला अतिक्रमण म्हटलं जात असेल. पण हे अतिक्रमण नाही हे तर आक्रमण आहे, हा लँड जिहाद आहे.

या महाराष्ट्रातील शिवभक्त मावळ्यांनी आपल्या रक्ताने सिंचित केलेल्या कोणत्याही किल्ल्यावरच अशा प्रकारचं आक्रमण खपवून घेणार नाही. आज पर्यंत शिवभक्त विखुरलेला होता, वैयक्तिक स्तरावर किंवा एकट्या दुकट्या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत होता. दुर्ग संवर्धनासाठी राबत होता. किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवणारा हा शिवभक्त, दुर्गसंवर्धनासाठी रक्त आटवणारा हाच शिवभक्त जेव्हा किल्ल्यावर जातो तेव्हा त्याला पुरातत्व खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून अडवले जाते. त्याची कोंडी केली जाते. त्याला हिडीसफिडीस वागणूक देऊन किल्ल्यांवर शिवकार्य करण्यास मज्जाव केला जातो. हाच शिवभक्त मात्र जेव्हा पाहतो अनेक किल्ल्यांवर मात्र लँड जिहादच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिलेली आहेत तेव्हा त्याच्या अंगाची लाही लाही होते. आज हाच शिवभक्त एकवटलेला आहे. तो जागृत झालेला आहे आणि आता या लँड जिहादच्या, अनधिकृत बांधकामांच्या विरोधात संघर्षासाठी उभा ठाकलेला आहे.

विशाळगडापासून सुरू झालेलं हे भगव वादळ रोखणं हे आता कुणाच्याही हातात राहिलेलं नाही. आमच्या मावळ्यांनी बलिदान दिलेल्या प्रत्येक किल्ल्यावर हे भगव वादळ घोंगावणार आणि तेथील अनधिकृत बांधकाम पाल्यापाचोळ्यासारखं उडवून लावणार.

अर्थात हे सारे शिवभक्त या देशाला, देशाच्या संविधानाला सन्मान देणारे आहेत. म्हणून हा लढा पूर्ण संवैधानिक मार्गानेच चालेल. सर्व शिवभक्त असं आणि प्रशासन यांना आवाहन करत आहेत पण आता तरी जागे व्हावे आणि लवकरात लवकर सर्व किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी अन्यथा सर्व शिवभक्त एकत्र येऊन संघटित होऊन वज्रमुठ बनवतील आणि त्या वजन मुठी चा प्रहार या अनधिकृत बांधकामांवर करतील. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवरची अनधिकृत बांधकामे साफ करून सर्व किल्ले लँड जिहाद मुक्त केल्याशिवाय आता शिवभक्त शांत बसणार नाहीत.

लेखक :- अभय जगताप ( शिवशंभू विचार मंच, कोकण प्रान्त संयोजक )

Back to top button