HinduismNewsSpecial Day

‘कलि महि राम नाम सारु’चा उपदेश देणारे श्री गुरूनानक देव…भाग १

श्री गुरूनानक देवांच्या जयंती प्रित्यर्थ ४ भागांची विशेष मालिका..

‘इक ओंकार सतिनाम’ असणाऱ्या निर्गुण परब्रह्माची एकनिष्ठ उपासना, विशुद्ध आचरण आणि श्रमप्रतिष्ठा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणारी भौतिक दृष्टी, सदाचाराचा जागर, तसेच नामदेवरायांसह अन्य प्रांतातील संत-भक्तांचे विचार संग्रहित करणारी समन्वयशील वृत्ती असलेल्या शीख परंपरेने नामदेवरायांचा आदर्श पुढे ठेवीत बहुजनांना एकत्रित केले. पुस्तकी पांडित्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाला आणि शस्त्रसज्जतेला महत्त्व दिले. त्यानिमित्ताने भक्ती आणि शक्तीचा खराखुरा संगम भक्तिआंदोलनाने अनुभवला. आद्यगुरु श्रीनानकदेवजी ते दशम गुरू श्रीगोविंदसिंहजी आणि अकरावे तसेच अंतिम गुरु ‘श्रीगुरुग्रंथसाहिब’ पर्यंतचा प्रवास करताना शीख संप्रदायाला अनेक खडतर प्रसंगांना, अमानुष क्रौर्याला सामोरे जावे लागले. श्रीगुरुनानकदेव आणि भारताचा आत्मा असलेल्या प्रभू श्रीरामाबद्दल आपण विस्ताराने जाणून घेऊया..

गुरु नानक जयंती हा शीखांचा सर्वात मोठा सण मानला जातो. गुरु नानक जयंती कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी अनुयायी भजन कीर्तन करतात आणि वाहेगुरुचा जप करतात. यंदा गुरुनानक जयंती १५ नोव्हेंबरला आहे.

श्री गुरु नानक जयंती ‘या’ नावांनीही ओळखली जाते..

गुरु नानक जयंतीला प्रकाश पर्व, गुरु पर्व, गुरु परब असेही म्हणतात. गुरु नानक जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी, प्रकाश पर्वाला साजरी केली जाते. गुरु नानक देवजींनी शीख पंथाची स्थापना केली. प्रकाशपर्व दिवशी पहाटेपासून गुरुद्वारांमध्ये धार्मिक विधी सुरू होतात आणि रात्री उशिरापर्यंत चालतात. या दिवशी लोक गुरुवाणीचे पठणही करतात. प्रकाश पर्वाच्या दिवशी संध्याकाळी लंगरचे ,महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

श्री गुरु नानक जयंतीचा इतिहास..

गुरु नानक देव हे शीख धर्माचे पहिले गुरु होते. गुरु नानक देवजी यांचा जन्म इ.स. १४६९ रोजी झाला. नानकजींचा जन्म १४६९ मध्ये कार्तिक पौर्णिमेला पंजाब (इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान) प्रदेशातील रावी नदीच्या काठी वसलेल्या तलवंडी नावाच्या गावात झाला. मात्र, आता गुरु नानकजींचे हे जन्मस्थान आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नानकाना साहिबमध्ये आहे.
आता या ठिकाणाचे नाव नानक देव म्हणून ओळखले जाते. येथे देश-विदेशातील लोक प्रसिद्ध गुरुद्वारा ननकाना साहिबला भेट देण्यासाठी येतात. असे म्हणतात की हा गुरुद्वारा ‘ननकाना साहिब’ शीख साम्राज्याचे राजा महाराजा रणजित सिंग यांनी बांधला होता.

श्री गुरू नानकदेवजी (इ.स. १४६९ ते १५३९)

शीख संप्रदायाचे संस्थापन, संघटन करणारे आद्य गुरू म्हणून श्रीगुरुनानकदेवांना महत्त्वाचे स्थान आहे. पंजाब / वायव्य भारत ही नानकदेवांची जन्मभूमी-कर्मभूमी असली तरी आपल्या चार ‘उदासीं’च्या (धर्मयात्रांच्या) निमित्ताने केवळ अखंड हिंदुस्थानच नव्हे तर मक्का मदिना, जेरूसलेम, तुर्कस्थान, दमास्कस, बगदाद, इराण आदी इस्लामधर्मीय देशांचाही प्रवास केला. श्रीलंका, नेपाळ, चीन, भूतान, कैलास मानससरोवरापर्यंतचा भूभाग त्यांनी पायी फिरून अनुभवला.

स्वत:ची ओळख करून देताना गुरू नानक देव म्हणतात – श्री राम आमचे पूर्वज आहेत, जे प्रत्येक युगात अवतार घेतात , त्यांच्या वंशात मी नानक कलिकाल अवतार घेतला आहे.

॥ सतगुरु नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चाणन होआ ।।

वर्ष १४६९, शरद ऋतूची सुरुवातीला, कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर, कालिकालच्या या भागात, बाबा नानक पृथ्वीवर अवतरले, ज्यांना आपण श्री गुरु नानक देवजी महाराज म्हणून ओळखतो. गुरू नानक देव जी यांनी स्वतःची ओळख जगाला कशी करून दिली ते जाणून घेऊया…

श्री रामचंद्र के वंशज गुरु नानक देव..

सूरज कुल ते रघु भया, रघवंस होआ राम ।
राम चन्द को दोई सुत, लवी कुसू तिह नाम ।
एह हमाते बड़े हैं, जुगह जुगह अवतार ।
इन्हीं के घर उपजू नानक कल अवतार ॥

गुरू नानक देवजींनी स्वतःची ओळख इतर कोठेही दिली नाही तर इस्लामचे केंद्र असलेल्या मदिना येथे जाऊनच दिली आहे. मार्गक्रमण ,भ्रमण करत असताना, गुरु नानक देव मक्केनंतर मदिना येथे पोहोचले, तेव्हा गुरू नानकांनी तिथल्या पीर बहाव दीनशी आपली उपरोक्त ओळख करून दिली.

सूर्य कुळात रघु नावाचा राजा होता, राम रघुच्या वंशात होता, रामचंद्रजींना कुश आणि लव असे दोन पुत्र होते. तो राम हा आपला पूर्वज आहे, जो प्रत्येक युगात अवतार घेत आहे, त्याच्या वंशात मी नानक कलिकाल अवतार घेतला आहे. पंजाबी विद्यापीठ, पटियालाचे डॉ. कुलवंत सिंग यांनी संपादित केलेल्या “मक्के मदिना की गोष्ठी” मध्ये पृष्ठ क्रमांक २५३ वर ही गोष्ट लिहिली आहे. या गोष्टीचा उल्लेख पवित्र “दशम ग्रंथाच्या” एका दोह्यातही आला आहे.

श्री गुरु नानक देवजींचे खरे अनुयायी हे जाणतात की गुरू नानक देवजी स्वतःला रघुकुलच्या श्री रामाचे वंशज म्हणवतात. हे या गोष्टीशी देखील जोडलेले आहे की त्यांच्या हयातीत, तीर्थयात्रेवर असताना, श्री गुरु नानक देव जी देखील त्यांच्या पूर्वजांचे स्थान पाहण्यासाठी अयोध्येला पोहोचले होते.

विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अधिवक्ता ( एडवोकेट ) आलोक कुमार म्हणतात, “श्री राम हा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे, गुरु ग्रंथसाहिबमध्ये राम हा शब्द वारंवार येतो, आजकाल काही लोकांनी नवीन अर्थ लावला आहे, ते म्हणतात की हा राम अयोध्येचा नाही, हे स्पष्टीकरण चुकीचे तथा पूर्णपणे भ्रामक आहे..

क्रमशः

Back to top button