संत गाडगे महाराजांच्या पुण्यस्मृती निमित्त ४ भागांची विशेष मालिका..
गाडगे महाराज व डॉ. आंबेडकर भेट आणि हिंदू धर्माचे रक्षण..
“खिश्चन बनूं नका. त्यानं आपल्या देशाले धोका आहे. आणि मुसलमान बनूं नका ।त्यानं सत्यानास होईल! — संत गाडगेबाबा..
बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराविषयीचे बाबांच्या कानी आलें होतें. पण आपण होऊन त्यांशी कसे बोलावें, असें अस्वस्थपण बाबांच्या मनी दाटले होतें. ते म्हणाले,
“त्याहिले सांगजा, का आपण येऊं नका, आमची येतों मनाव्! चला, आमी आताच तुमासंगे चलतों।”
लगेच बाबा त्यांच्यासवें निघून कुलाब्यास आंबेडकर होते, तिथें पोंचले. तिथें घनघोर बैठक सुरू होती. चर्चा चालली होती, कीस पडत होते. बाबा आले, हें कळतांच सगळेच बाहेर आले. डॉ. आंबेडकर बाबांना म्हणाले,
“बाबा, आम्ही आपणांकडे येणार होतों-“
“आम्ही आपल्याले सोधीत आलों-“
“पण आमचं आपणाशीं काम होतं-“
“अहो, आपणामागं इतली कामं आहेत त्यातलं एक
काम करायले आमी मदत केली. “
“आपल्याला त्रास झाला-“
“आपुन किती तरास घेता? भारताची घटना बनवली, चहूंकडे विद्येचा प्रकाश पाडला! या दलितांसाठीं रातदीस खटपट करून राहिले! धन्य आपले मातापिता!”
डॉक्टर आंबेडकर हात जोडून म्हणाले,
“बाबा, आपण माझे गुरू आहांत. एका बाबतींत मला आपला सल्ला पाहिजे. “
“बोला, मले अडान्याले उमगलं थे सांगन्!”
“मीं निश्चय केला की हिंदुधर्म सोडून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायचा!” बाबा एकदम गंभीर झाले. आंबेडकर म्हणाले,
“खूप प्रयत्न केला बाबा! जन्मभर धक्के खात आलों. घटना बनविली म्हणून आपण माझं कौतुक करतां. मी शिकून डॉक्टर झालों, तरी मला इतका त्रास भोगावा लागला. अन् माझे हे संगीसाथी ज्यांना विद्या नाहीं, जवळ पैसा नाहीं, मान नाहीं, प्रतिष्ठा नाहीं, त्यांना किती भोगावें लागत असेल! आपल्या तर सगळें माहीत आहे, बाबा! माझा निर्णय पक्का झाला. आतां कुठला धर्म स्वीकारूं तें मला सांगा!”
बाबा पुटपुटले,
“मले काय धर्माचं न्यान? मी अडानी धोबी !”
“छे छे बाबा, आपल्याला फार कळते. आपण सांगाल तें मी करीन. माझ्याकडे रुपयांच्या थैल्या घेऊन माणसं येताहेत – आमच्या धर्मात या म्हणून!” बाबा गप्प राहिले, अन् थोड्या वेळाने म्हणाले,
“हे पाहा आंबेडकर साहेब, सगळी पददलित जमात तुमामागे आहे. तुमी जो रस्ता दावान्, त्या रस्त्यानं हे सगळे येतीन्. त्याहिची तुमावर सरधा आहे. तुमच्या एक आक्षेरासाठी हे लोक जीव टाकतीन्, याहिले भलत्या वाटीनं नेऊं नोका!”
“काय करूं?”
“हे तुमचं तुमी पाहेजा. इतलं सांगतो, दोन रस्ते वगळा.’ “
“कोणते?”
“ख्रिश्चन बनूं नका. त्यानं आपल्या देशाले धोका आहे.
आनि मुसलमान बनूं नका ! त्यानं सत्यानास होईल!
बस,आमी जातों!”
उठून आबंडेकर म्हणाले,
“बाबा, मी आपली आज्ञा पाळीन. या देशांत दोनच जाती सावध आहेत. ब्राह्मण आणि माहार. मी त्या सगळ्या माहारांना घेऊन बौद्ध धर्मात जाईन !
नागपुरास हा दीक्षाविधी व्हायचं ठरलं आहे. आपला आम्हास आशीर्वाद द्या!”
संदर्भ :- श्री गाडगे महाराज (मृण्मयी प्रकाशन)
लेखक :- गो. नी. दांडेकर (पान क्र. २०० व २०१)
वरील परिच्छेदावरून आपल्या लक्षात आलेच असेल की, गाडगे बाबांनी दिलेला सल्ला, डॉ. बाबासाहेबआंबेडकरांनी मानला आणि याच भरतभूमीचा सुगंध असलेल्या बौद्ध मताचा स्वीकार केला. त्यामुळे भारत राष्ट्रासमोरील धार्मिक आधारावरील लोकसंख्या असंतुलनाचे अरिष्ट टळले. गाडगे बाबांच्या धर्मविचाराचा पाया राष्ट्र व समाजाच्या हिताशी निगडित होता. एकूणच काय तर संत परंपरेचं अखंड निर्वाहन गाडगे बाबांनी केल..
आज ख्रिश्चन आणि मुसलमान या राष्ट्राबाहेरच्या विचारधारांनी आपले सनातन राष्ट्रजीवन धोक्यात आणले आहे. जरा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की आज आपल्या आजू-बाजूला ख्रिश्चन, मुसलमानांनी भोळ्या-भाबड्या हिंदूंचे जबरदस्तीने, फसवून; पैश्याचे, उपचाराचे आमिष दाखवून धर्मांतर करून हैदोस घातला आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, गेम जिहाद, महिलांवर बलात्कार, अत्याचार असे कितीतरी गंभीर प्रश्न हिंदू समाजापुढे आ वासून आहेत.
देशाच्या ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य झाले, तो तो भाग भारतापासून दुरावला. उदा. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मांतरामुळे ख्रिश्चन बहुल झालेल्या नागालँड, मिझोराममध्ये दीर्घकाळ फुटीरतावादी चळवळी फोफावल्या होत्या.. तर मुस्लिम बहुसंख्य जम्मू -काश्मीरमध्ये तर काश्मीर खोऱ्यातील लक्षावधी हिंदूंना नेसत्या वस्त्रासह पलायन करावे लागले होते. जम्मू काश्मीर मधील रक्तरंजीत आतंकवादाचा नंगा नाच देशाने सहा दशकांहून अधिक काळ अनुभवला आहे.
गाडगेबाबा धार्मिक क्षेत्रात कार्यरत होते तर बाबासाहेब आंबेडकर राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. पण दोघांचं ध्येय समान होतं, या चिरंतन राष्ट्राचे हित, समाजाची अखंडता..
क्रमशः