News

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस

babasaheb ambedkar mahaparinirvan din

छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई

६ डिसेंबर २०२३ रोजी विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉ भीमराव उर्फ बाबासाहेब आंबेडकर जी (babasaheb ambedkar) यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी देशाच्या विविध भागातून बौद्ध, नवबौद्ध, बहुजन, आणि डॉ आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेले राष्ट्रप्रेमी बांधवांचा अथांग जनसागर उसळला होता. सर्व बांधवांची मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे करण्यात आली होती.

लाखोंच्या संखेत आलेल्या जनसागराला दोन रुपया मध्ये पोटभर जेवणाची सुविधा समता परिषद, मुंबईचे कार्याध्यक्ष श्री. अशोक कांबळे जी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. “सेवेतून समाजपरिवर्तन” हे ब्रीदवाक्य घेऊन सन १९७९ ला स्थापन झालेली “समता परिषद, मुंबई” ही सेवाभावी संस्था १९८४ पासून सातत्याने भाजी-पोळी, पुलाव, आणि चहा-बिस्किटांचे वाटप करत आहे. या कार्याची पूर्व तयारी एक महिना आधीपासून सुरू होते.

सन २००७ ला स्थापन झालेली व अॅड. अनार्य पवार द्वारा संचालित “अधिष्ठान सामाजिक संस्था, मुंबई” हे मागील १० वर्षांपासून चैत्यभूमी परिसरात मोफत वरण-भात, भाजी-पोळी, नाश्ता, चहा-बिस्किट देऊन सेवा करत आहे, परंतू मोठ्याप्रमाणात होत असलेल्या अन्नाची नासाडी टाळण्यासाठी संस्थेने मागील ३ वर्षापासून नाश्ता, चहा-बिस्किट, चिवडा इत्यादि पॅकेट बंद खाद्य पदार्थ निशुल्क वितरण करण्यात येत आहे.

“वाचाल तर वाचाल”, महामानवाच्या या आव्हाहणाला साथ देऊन “ज्ञानम” या राष्ट्रीय विचारांचे पुस्तक विक्री केंद्र असलेल्या संस्थेने राष्ट्र विचाराचे आणि राष्ट्राला नवदिशा दाखविणारे महापुरुषांचे वितरण करायला स्टॉल लावले. यात मुख्यतः वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सयाजीराव गायकवाड, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे, बाबासाहेबांच्या भाषणाचे पुस्तके अत्यल्प दरात उपलब्ध होते. ज्ञानमला नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.

Back to top button