नागपूरच्या प्राध्यापकाला जागतिक सर्वोत्कृष्ट संशोधकांत स्थान
नागपूर, दि. २६ नोव्हेंबर – भारतीय प्रौद्योगिकी संस्था अर्थात आयआयटीचे आशीष दर्पे यांना जगातील सर्वोत्कृष्ट संशोधकांमध्ये स्थान मिळाले आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील जगभरातील दोन टक्के संशोधकांची यादी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने सर्वेक्षणाच्या माध्यमातून तयार केली होती. मूळचे नागपूरचे असलेले प्रा. दर्पे हे सध्या आयआयटी दिल्ली येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या यादीत पहिल्या ६४२ संशोधकांच्या यादीत प्रा दर्पे यांमा सातवे स्थान मिळाले असून भारतात त्यांना सातवे स्थान मिळाले आहे. आपल्या या यशाबद्दल प्रा दर्पे सांगतात की, विनयशीलता, परिश्रम करण्याची तयारी, चाणाक्षपणा आणि ज्ञानाची शक्ती असेल त्यांना हे यश सहज साध्य होते. ज्यांच्याकडे वैज्ञानिक संस्कृती असते तो समाज आणि राष्ट्र नक्कीच समृद्ध असते.
देवाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपणे हे निरर्थक आहे. त्यापेक्षा लोकांना आपल्या आयुष्यात आदर्श वर्तणुकीने प्रेरित करणे व त्यांना त्याद्वारे चांगल्या वाईटातील फरक शिकवणे आवश्यक आहे. देवाचे खरे अस्तित्व हे आदर्श जीवन जगण्यात आहे असे मला वाटते, असेही ते म्हणाले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आयआयटी दिल्लीला व आपल्या कुटुंबाला दिले आहे. दर्पे यांचे १०० शोधनिबंध प्रकाशित झाले असून यांपैकी ५३ आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये आले आहेत.
**