जुलमी ब्रिटिशांनी लुटले नसते तर भारताने आजच्या अमेरिकेला दोनदा विकत घेतले असते..
uk looted 64 trillion dollar from india during its rule said oxfam report
‘One of the very first Indian words to enter the English language was the Hindustani slang for plunder: “loot”. According to the Oxford English Dictionary, this word was rarely heard outside the plains of north India until the late 18th century, when it suddenly became a common term across Britain.’ – William Dalrymple (The East India Company : The Original Corporate Riders)
तो शब्द होता ‘लूट’…!
कपटी इंग्रजांनी भारतावर १५० हून अधिक वर्षे राज्य केले. याकाळात दुराचारी इंग्रजांनी भारताची प्रचंड लूट केली. या लुटीसंदर्भातच एक नवीन रिपोर्ट ऑक्सफॅम या लंडन मध्ये स्थापन झालेल्या जागतिक असमानतेवर काम करणाऱ्या संस्थेने जारी केला आहे.
Oxfam releases global inequality report…
ऑक्सफॅमने जारी केलेल्या अहवालात महत्वाची माहिती दिली आहे. या अहवालात असं म्हटलं आहे की, १७६५ ते १९०० या काळात ब्रिटिशांनी भारतातून तब्बल ६४.८२० ट्रिलियन डॉलर्स रक्कम लुटली. आजच्या सगळ्यात श्रीमंत समजल्या जाणार्या अमेरिकेचा GDP २५ ट्रिलियन डॉलर्स इतका आहे. याचाच सोपा अर्थ असा की, जर भारताला जुलमी ब्रिटिशांनी अनन्वित छळ करून लुटले नसते तर आज भारताने अमेरिकेला दोन विकत घेतले असते.
समृद्ध, वैभवशाली, भारताची अगणित लूट..
इंग्रजांच्या भारतात येण्यापूर्वी भारत हा श्रीमंत देश होता, येथील जमीन सुपीक होती आणि देशात अनेक संसाधने होती. भारतातील सूती आणि मलमल कापडाला जगभर मागणी होती. शिपिंग आणि स्टील इंडस्ट्रीमध्ये भारताचे वर्चस्व होते. १७५० साली भारताचे जागतिक औद्योगिक उत्पादनामध्ये २५ टक्के योगदान होते. ऑक्सफॅमच्या रिपोर्टनुसार १९०० साली हे केवळ २ टक्क्यांवर पोहचले. १७०० मध्ये भारतात जगातील २२.६ टक्के संपत्ती होती. जी पूर्ण युरोपच्या संपूर्ण संपत्तीच्या बरोबर होती. मात्र १९५२ साली भारतातील संपत्तीचा वाटा केवळ ३.८ टक्के उरला .
वसाहतवादामुळे जग कमालीचे विषम झाले. वंशाधारित विभागलेल्या या जगात ‘ग्लोबल साऊथ’कडून मिळवलेल्या संपत्तीतून पद्धशीरपणे ‘ग्लोबल नॉर्थ’मधील धनाढ्यांचे इमले उभे राहिले.लंडनचे क्षेत्रफळ ५० पौंडाच्या चलनी नोटेद्वारे चार वेळा आच्छादले जाईल, इतकी अवाढव्य ही रक्कम आहे. ब्रिटनच्या वसाहतवादाचा लाभ तेथील धनाढ्यांबरोबरच नवमध्यम वर्गालाही झाला. तेथील नवमध्यम वर्गाला ३२ टक्के संपत्ती मिळाली.
ब्रिटनमध्ये आजघडीच्या मोठ्या संख्येतील धनाढ्यांच्या संपत्तीचा स्रोत हा गुलामगिरी आणि वसाहतवादात सापडेल. या अहवालात इंग्रजांची क्रूरताही उघड झाली आहे. 1891 ते 1920 दरम्यान, वसाहतवादी धोरणांमुळे भारताला दुष्काळ, रोगराई आणि गरिबीचा सामना करावा लागला.
इंग्रज किती लुटारु होते ते त्यांनी बंगालवर कब्जा करताच क्षणी दाखवून दिले. १७५७ च्या प्लासीच्या लढाईत बंगालच्या नवाबाचा पराभव केल्यानंतर इंग्रजांनी सुसंस्कृतपणा तर सोडाच, साधा विवेक ही दाखवला नाही. त्यांनी लुटाऱ्यां सारखे, बंगालच्या पूर्ण खजिन्याला १०० जहाजात भरून नवाब महालातून कलकत्याच्या त्यांच्या मुख्यालयात, ‘फोर्ट विलियम’ मध्ये, पोहोचविले.
त्याकाळी बंगाल हा अत्यंत संपन्न प्रांत होता. बंगालचा खजिना अत्यंत समृद्ध होता. अश्या संपन्न खजिन्याचे ब्रिटीशांनी काय केले? त्यातील अधिकांश हिस्सा इंग्लंडमध्ये पाठवण्यात आला. आणि त्याच पैशातून वेल्स प्रांतातील पोविसच्या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला गेला. त्या किल्ल्याची मालकी नंतर रॉबर्ट क्लाईव्हच्या कुटुंबाकडे आली.
बंगालच्या या लुटीनंतर सत्तेत असल्यामुळे इंग्रज बंगालला लुटतच राहिले. परंतू काही वर्षांनी जेव्हा बंगालमध्ये महाभयानक असा दुष्काळ पडला, तेंव्हा या इंग्रज शासकांनी काय केले?.. काहीच नाही…!
१७६९ ते १७७१ ही तीन वर्षे अतिशय भयंकर दुष्काळाची होती. मात्र लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या इंग्रजांनी काय केले? त्यांनी एवढी प्रचंड लूट केली होती, त्या लुटीतील छोटासा तरी हिस्सा या दुष्काळग्रस्तांना दिला का? तर उत्तर नकारार्थी आहे.
या महाभयंकर दुष्काळात जवळपास एक कोटी जनतेचा जीव गेला. अर्थात एक तृतीयांश लोकसंख्या मारली गेली. परंतू कंपनी बंगालचा सर्व महसूल इंग्लंडमध्ये पाठवत राहिली.
ऑक्सफॅम अहवाल १७६५ ते १९०० या काळात ब्रिटिशांनी केलेल्या लुटीसंदर्भात आहे, पुढचे काय ? देश १९४७ साली स्वतंत्र झाला, या ४७ वर्षात २ महायुद्धे झाली त्यात इंग्रजांनी केलेल्या लुटीबद्दल भाष्य करणे ऑक्सफॅमने का टाळले ?? कदाचित दुप्पटीहून अधिक रक्कम भरेल याची ऑक्सफॅमला भीती वाटत असावी…
आज लाजे काजेस्तव ब्रिटिशांना त्यांनी केलेल्या अनन्वित अत्याचार, समृद्ध भारताची केलेली लूट यावर भाष्य करावे लागतेय कारण भारताशी चांगले संबंध पाताळयंत्री ब्रिटिशांना हवे आहेत..ब्रेक्झिट मुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था पार डबघाईला आली आहे. याउलट आत्मभान जागृत झालेल्या भारताने अर्थव्यवस्थेत कळसूत्री ब्रिटिशांना कधीच मागे टाकले आहे. अगदी काहीच वर्षात भारत जगातील तिसरी बलाढ्य आर्थिक महाशक्ती म्हणून स्थानापन्न होणार आहे..
आमच्या प्राणप्रिय भारतमातेवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या ब्रिटिशांना एवढेच सांगू इच्छितो की,
गोपाल-राम के नाम पर कब मैंने अत्याचार किए?
कब दुनिया को हिन्दू करने घर-घर में नरसंहार किए?
कब बतलाए काबुल में जा कर कितनी मस्जिद तोड़ीं?
भूभाग नहीं, शत-शत मानव के हृदय जीतने का निश्चय।
हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय !
पण जसे नाग जोपर्यंत त्याच्या वाट्याला कोणी जात नाही तोपर्यंत हल्ला करत नाही, त्याचा केवळ फुत्कारच समोरच्याला धडकी भरविण्यास पुरेसा असतो..
हा नवीन भारत आहे,
ओतप्रोत आत्मविश्वासाने भरलेला,
आत्मनिर्भर भारताची मोहोर जगावर उमटविण्यास सज्ज झालेला..