NewsRSS

बजरंगदला तर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई, दि २३ एप्रिल : देशातील कोरोना महामारीची वाढती व्याप्ती व राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, विश्व हिंदू परिषदेचे युवा संघटन बजरंगदलाने महारक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. मुंबई, ठाणे – कल्याण, पालघर, नवी मुंबई, रायगड तसेच कोंकण पट्यात एकूण ३८ ठिकाणी रक्तदान करणायत येईल. श्री राम नवमी १८ एप्रिल ते श्री हनुमान जन्मोत्सव २७ एप्रिल २०२१ या १० दिवसांच्या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्येत चालणार्‍या या महारक्तदान शिबिरा मार्फत जवळपास ५,००० युनिट रक्त संचय करण्याचा बजरंगदलाचा मानस आहे.

सेवा – संस्कार – सुरक्षा या त्री सूत्रीच्या आधारे लोकोपयोगी सेवा देण्यासाठी कोणत्याही कठीण परिस्थितीत बजरंगदलाचा कार्यकर्ता हा सदैव तत्पर असतो. गेल्या वर्षी कोविड महामारीच्या काळात गरजूंना घरोघरी जाऊन अन्न / औषध पोहोचविणे, विविध सरकारी कार्यालये, इस्पितळे, मंदिरे, दवाखाने तसेच रहिवासी संकुलांचे निर्जंतुकीकरण करणे. तसेच प्रत्यक्ष (कन्टेनमेंट झोन) प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचे कार्य बजरंगदलाने केले होते.

महाराक्तदान शिबिरांच्या आयोजनाला स्थानिक प्रशासन व नागरिकांनी सहकार्य करून कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात राज्यात रक्ताचा तुटवडा असताना रक्तदान करून राष्ट्र हिताच्या कार्यात सहभागी व्हावे असे आव्हाहन वि.हिं.प. कोंकण प्रांत, बजरंगदलाचे  संयोजक संदीप भगत यांनी केले आहे.  अधिक माहितीसाठी 9820967185 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Back to top button