मलबार हिंदू हत्याकांडाची शंभर वर्षे
दिल्ली – मलबार हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने 25 सप्टेंबर 2021 रोजी येथील चरखा म्युझियम पार्क राजीव चौक येथे ‘1921 मलबार हिंदू हत्याकांडाची शंभर वर्षे’ निमित्त श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या दिवशी केरळच्या मलबारमध्ये हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी हुतात्मा झालेल्यांचे स्मरण करण्यात आले.
या श्रद्धांजली सभेत प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे नंदकुमारजी, ज्येष्ठ विधिज्ञ मोनिका अरोरा, खासदार रमेश बिधुरी, राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि दिल्ली भाजपा युवा नेते कपिल मिश्रा यांनी मलबार हिंदू हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ अधिवक्ता मोनिका अरोरा यांनी हुतात्म्यांची आठवण काढताना सांगितले की, मार्क्सवादी इतिहासकारांनी हा भीषण हिंदू नरसंहार, भारतीय स्त्रियांविषयी केलेले गैरवर्तन आणि बलात्कार हे जमीनदार आणि ब्रिटिशांच्या विरोधातील शेतकरी चळवळ म्हणून नोंदवले.खिलाफत चळवळ फक्त इस्लाम आणि खलिफाच्या समर्थनासाठी एक चळवळ होती, त्याला स्वातंत्र्य चळवळ म्हणून सादर केले गेले. आजची राष्ट्रवादी पिढी, राष्ट्रवादी विचारवंत यापुढे हा चुकीचा इतिहास वाचणार नाहीत किंवा चुकीचे शिकवणार नाहीत.इतिहासाची ही भीषण आणि क्रूर वागणूक यापुढे सहन केली जाऊ शकत नाही. भारताच्या इतिहासात घडलेली ही वस्तुस्थिती 100 वर्षांपूर्वी नोंदवली गेली असती, तर हजारो हिंदूविरोधी हिंसा आणि दंगली रोखता आल्या असत्या.
जे. नंदकुमारजी म्हणाले की, जर तुम्हाला तुमचा इतिहास योग्य स्वरूपात समजला नाही आणि योग्य दृष्टीकोनातून आठवत नसेल तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणून आपण आपल्या इतिहासाबद्दल काळजी घेतली पाहिजे.त्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. ते म्हणाले की, 1921 चे हे हिंदू हत्याकांड पहिले नव्हते. त्यावेळी दंगलींची एक संपूर्ण मालिका होती ज्यात सुमारे 52 मोठया आणि 32 किरकोळ दंगली होत्या. हिंदूंना पळून जावे लागले.त्यांना आपले घर आणि जमीन सोडून कोची आणि त्रावणकोरला स्थलांतर करावे लागले. दंगलींनी प्रभावित झालेल्या मलबारच्या इतिहासाच्या सत्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. तो इतिहास दुरुस्त करण्यासाठी नंदकुमारजींनी केरळ राज्य सरकारसमोर तीन मागण्या मांडल्या –
- मलबार हिंदू हत्याकांडाच्या स्मरणार्थ स्मारक बांधले पाहिजे.
- त्या दंगलखोरांची नावे स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीतून काढून टाकावीत.
- त्या दंगलखोरांना दिल्या जाणाऱ्या सरकारी सुविधा ( पेन्शन, सरकारी पद आदि ) काढून टाकाव्यात.
भारतीय जनता पक्षाचे युवा नेते कपिल मिश्रा म्हणाले की, खरेतर 100 वर्षांपूर्वी डाव्या मार्क्सवादी इतिहासकारांनी चूक केली होती. त्यांनी हिंदूंवरील अत्याचार आणि नरसंहाराला राष्ट्रीय चळवळीशी जोडले आणि त्याला ब्रिटिशांविरूद्ध बंड म्हटले.आज ती चूक सुधारण्याचा दिवस आहे. इतिहासात झालेल्या चुका यापुढे सहन केल्या जाणार नाहीत. पुढील पिढी डाव्यांनी लिहिलेला चुकीचा इतिहास वाचणार नाही. यापुढे बनावट इतिहासकार आणि दंगेखोरांचा गौरव होणार नाही.आम्ही संग्रहालये किंवा स्मारके बनवू, परंतु आम्ही त्या अमर बलिदानाची आठवण नेहमी ठेवू.
खासदार विनय सहस्रबुद्धे म्हणाले की, आजचा कार्यक्रम म्हणजे विसरलेल्या इतिहासाचे सत्य उलगडण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे. हा कार्यक्रम सूड घेण्यासाठी नाही तर त्या हिरोंचे स्मरण करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे, ज्यांनी हिंदू हिताचे रक्षण करण्यासाठी आपले बलिदान दिले. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवतो पण लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना पाठिंबा देणे चुकीचे आहे.नव्या पिढीला राष्ट्राच्या एकतेच्या आव्हानाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. आम्ही मलबार हुतात्म्यांच्या अमूल्य योगदानाला योग्य स्थान देऊ, जे शूर आहेत, ज्यांनी आपले प्राण दिले पण धर्मांतर स्वीकारले नाही, जेणेकरून येणारी पिढी त्यांचे आदरपूर्वक स्मरण करेल, असेही ते म्हणाले.
- सौजन्य IVSK दिल्ली