सागरी सीमा मंचाच्यावतीने राज्यपालांना निवेदन
मुंबई, दि. २९ नोव्हेंबर : पालघर तालुक्यातील वडराई गावातील मच्छीमार खलाशी श्रीधर रमेश चामरे ह्यांचा पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारात जागीच मृत्यू झाला, या संदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, यांना सागरी सीमा मंच, कोकण प्रांत द्वारे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात सुरक्षा यंत्रणा विकसित करण्यात विषयक, माहिती देण्यात आली.
त्यासोबतच यापुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर सागरी सीमेवर अशा प्रकारच्या अनुचित घटना घडू नयेत म्हणून केंद्र सरकारने सुरक्षाव्यवस्था द्वारे भारतीय मासेमारी नौकांना सहकार्य करावे आणि संरक्षण देण्यासाठी योग्य त्या हालचालीने त्वरित यंत्रणा विकसित करण्यात यावी, ही विनंती करण्यात आली.
मृत खलाशी बांधवांच्या वारसदारांना केंद्र त्यासोबतच यापुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर सागरी सीमेवर अशा प्रकारच्या अनुचित घटना घडू नयेत म्हणून केंद्र सरकारने सुरक्षाव्यवस्था द्वारे भारतीय मासेमारी नौकांना सहकार्य करावे आणि संरक्षण देण्यासाठी योग्य त्या हालचालीने त्वरित यंत्रणा विकसित करण्यात यावी, ही विनंती करण्यात आली. व महाराष्ट्र सरकार द्वारा आर्थिक मदत व भविष्यात परिवारातील मंडळींच्या उदरनिर्वाह प्रश्ना संदर्भात मदत करावी या मागणीसाठी सागरी सीमा मंच कोकण प्रांत संयोजक संतोष पावरी, सह संयोजक संतोष सुर्वे, सुचित्रा इंगळे- महिला सह संयोजक, राजेंद्र तरे पालघर जिल्हा संयोजक व सुफला तरे व मयत चामरे यांच्या काकी नंदिनी चामरे, निवेदन देताना सहभागी होत्या.