Opinion

आम्ही सक्षम आहोत : लष्कर प्रमुख

ग्लोबल टाइम्सने दावा केला आहे की, देशांतर्गत संघर्षावरून लक्ष हटवण्यासाठी भारताने चीनविरोधी वक्तृत्व अधिक तीव्र केले आहे. चिनी मीडियाने दिवंगत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि भारतात कोरोनाची तिसरी लाट यांचाही उल्लेख केला आहे. शेजारी देश दहशतवाद्यांना सतत सुरक्षित आश्रय देत आहे. ते म्हणाले,’दुसऱ्या सीमेवर शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तान सातत्याने दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देत आहे. 300 ते 400 दहशतवादी नियंत्रण रेषेजवळील छावण्यांमध्ये नव्याने घुसखोरी करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. “गेल्या वर्षी युद्धविराम उल्लंघनाच्या घटनांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी पाकिस्तानच्या भयंकर कारस्थानांचे प्रतिबिंब आहे. ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवरील आव्हानांविषयी सेना दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लष्करी सज्जता राखण्याच्या दृष्टीने व्यापक नियोजनाची गरज अधोरेखित केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षांनंतर भारत-चीन लष्करस्तरीय बैठकांमध्ये काही भागांतून सैन्य माघारीवर सहमती झाली; परंतु काही भागांत ती अद्याप झालेली नाही. याच काळात उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात नव्याने घुसखोरी झाली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा एकतर्फी बदलण्यासाठी गाव वसविणे, पूल उभारणी असे चिनी उद्योग उघड झाले आहेत. सीमेलगत चिनी सैन्याची तैनाती, पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. यात चीनच्या नव्या भू सीमा कायद्याची भर पडली.

पाकिस्तानपाठोपाठ भारत-चीन सीमा ज्वलंत झालेली आहे. एकाच वेळी दुहेरी आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्करी धोरणांची फेरआखणी क्रमप्राप्त झाली आहे. आपले लष्करी धोरण, डावपेच प्रारंभीचा बराच काळ मुख्यत्वे पाकिस्तानला समोर ठेवून आखले गेले. चीनच्या सीमेवरील आव्हाने लक्षात येण्यास उशीर झाला. जेव्हा ती लक्षात आली, तोपर्यंत चीनने भारतालगतची तटबंदी भक्कम केल्याचे लक्षात येते. तिबेटमध्ये रेल्वे आणणे, सीमावर्ती रस्त्यांचा विकास, क्षेपणास्त्र तैनाती, लष्करी आणि हवाई तळांच्या उभारणीद्वारे चीनचे मनसुबे उघड आहेत. भारत-चीनदरम्यान सुमारे साडेतीन हजार किलोमीटरची सीमा आहे. यातील ९५ टक्के प्रत्यक्ष नियंत्रण रेषा सीमांकित नाही. याचा चीन घुसखोरी, भारतीय भूप्रदेशावर दावा करण्यासाठी उपयोग करतो. सध्याच्या संघर्षमय वातावरणात सीमा वादावर तोडगा निघण्याची अपेक्षाही व्यर्थ. सीमावादाचे घोंगडे चीनकडून भिजतच ठेवले जाईल. प्राप्त स्थितीत लष्करी सज्जता राखणे हा महत्त्वाचा मार्ग आहे.


चिनी सैन्याला खंबीरपणे तोंड देण्यासह कुठलीही आणीबाणीकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्याचे लष्करप्रमुख नरवणे यांनी नमूद केले आहे. भारत-म्यानमार सीमेची जबाबदारी ‘आसाम रायफल्स’वर सोपवून तेथील सैन्य चीनलगतच्या सीमेवर नेण्याची तयारी आहे. मागील काही वर्षांत चीनच्या हालचालींप्रमाणे आपल्याला लष्करी नियोजन करावे लागत आहे. लष्करप्रमुख म्हणाले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी चर्चेच्या फेऱ्याही झाल्या आहेत. ते म्हणाले, “आम्ही परस्पर आणि समान सुरक्षेच्या आधारावर सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढत राहू.”
चीनने तिबेटमध्ये रेल्वे आणल्यावर आपण अरुणाचल प्रदेशमध्ये सर्व ऋतूंत वाहतुकीस योग्य रस्ते बांधणीवर लक्ष केंद्रित केले. सैन्य, शस्त्रसामग्रीच्या जलद हालचालीसाठी सीमावर्ती भागात रेल्वे मार्गाची कामे प्रगतिपथावर आहेत. लडाख आणि अरुणाचलमध्ये विमानांसाठी धावपट्टी दुरुस्त करून त्या लढाऊ आणि मालवाहू जहाजांना उतरण्यायोग्य करण्याचा कार्यक्रम हाती घेतला गेला. आसाममधील तेजपूर हवाई तळावर सुखोई लढाऊ विमानांची तुकडी नेण्यात आली. डोंगराळ भागात नेण्यायोग्य वजनाने हलक्या तोफा तोफखाना दलाच्या भात्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.


गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर तणाव कायम आहे. त्याच वेळी, भारतीय लष्कराने एलएसीवरील चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ड्रॅगनच्या प्रत्येक हालचालीला हाणून पाडण्याची तयारी देखील केली आहे. चीनवर बारीक नजर ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने LAC वर नवीन कॅमेरे आणि सेन्सर बसवले आहेत. भारताने LAC वरील जुने कॅमेरे बदलून उच्च दर्जाचे नवीन कॅमेरे बसवले आहेत. एवढेच नाही तर आधुनिक शस्त्रास्त्रांसोबतच ऑपरेशनल एरिया नवीन उपकरणांनी सुसज्ज करण्यात येत आहे.


लष्कर आपल्या आधुनिकीकरणाच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे. आणीबाणीच्या आणि जलदगती योजनांतर्गत, लष्कराने सुमारे ₹5,000 कोटींची उपकरणे खरेदी केली आणि भांडवली खरेदी अंतर्गत गेल्या वर्षी ₹13,000 कोटींचे करार केले.


पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत चीनवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी कॅमेरे आणि सेन्सरमध्ये बदल केले आहेत आणि ते पूर्वीपेक्षा जास्त संख्येने स्थापित केले आहेत. या कॅमेऱ्यांनी आणि सेन्सर्सने तयार केलेले नेटवर्क डोंगरापासून दूर आणि जमिनीवर बसलेल्या कमांडर्सनाही तातडीने कारवाई करण्यास मदत करत आहे. हे जाळे तयार करण्यापूर्वी संसदीय समितीलाही माहिती देण्यात आली आणि चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देशाला मोठ्या प्रमाणावर कॅमेरे आणि सेन्सर्सचे जाळे आवश्यक असल्याचे सांगितले.भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.
चिनी सैन्याशी दोन हात करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, त्याचा विचार करावा लागत आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षांत चिनी लष्कराने भारतीय सैन्याच्या सज्जतेची पडताळणी केली. त्या अनुषंगाने साडेतीन हजार किलोमीटरच्या सीमेवरील व्यूहरचनेत तो बदल करू शकतो, किंबहुना ती प्रक्रिया एव्हाना त्याने सुरू केलेली असावी. चीनच्या सीमेवरील धोका कमी झाला नसल्याचे लष्करप्रमुख नरवणे यांचे सांगणे पुढील काळातील आव्हाने लक्षात आणून देण्यास पुरेसे आहे.

Back to top button