Vishwa Samvad Kendra, Kokan
Contact
Vishwa Samvad Kendra
Email: info@vskkokan.org
About
‘विश्व संवाद केंद्र’ हे राष्ट्रीय माध्यम केंद्र म्हणून प्रसारमाध्यम विश्वामध्ये सुपरिचित आहे. संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आपल्या सुसज्ज कार्यालयांच्या माध्यमातून विश्व संवाद केंद्र कार्यरत आहे. राष्ट्रीय महत्वाच्या व सामाजिक परिवर्तनाच्या नाना विविध विषयांवर संशोधन व त्यावर आधारित विमर्ष उभा करण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याचे मुख्य कार्य असे आपले स्वरूप आहे. विविध माध्यमं, लेखक, साहित्यिक व पत्रकार यांच्या समन्वयातून समाजात एक सकारात्मकता प्रसारित व प्रचारीत करण्याचे हे एक केंद्र आहे.
पार्श्वभूमी
१९९० च्या दशकाच्या प्रारंभी श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना या आंदोलनाच्या गतीविधींविषयी तथ्यात्मक माहिती मिळणे आवश्यक बनले होते. त्यातूनच अयोध्येचे तत्कालीन जिल्हा मुख्यालय फैजाबाद, लखनौ आणि दिल्ली येथून देशभरातील प्रसारमाध्यमांना वृत्त पाठविण्यास सुरूवात करण्यात आली. पुढे २००३ साली मुंबई येथे ‘प्रसार भारती’चे तत्कालीन अध्यक्ष एम. व्ही. कामत यांच्या उपस्थितीत मुंबई येथील ‘विश्व संवाद केंद्र’ ही स्थायी संरचना अस्तित्त्वात आली.
ध्येय
“संवादात सौहार्दम्” हे विश्व संवाद केंद्राचे ब्रीदवाक्य आहे. प्रसारमाध्यम क्षेत्रात राष्ट्रीय विचार प्रवाहांना उत्तेजन देणे, त्यांचा प्रचार – प्रसार करणे व सकारात्मक विचारांच्या आधारावर सकारात्मक विमर्ष उभा करणे हे विश्व संवाद केंद्राचे मुख्य ध्येय आहे.
उद्दिष्टे
प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सामाजिक आणि डिजिटल प्रसारमाध्यम समुहांना राष्ट्रीय विषयांवरील मजकूर बातम्या, लेख, ग्राफिक्स, व्हिडीओ व स्रोत स्वरूपात उपलब्ध करून देणे.
समाजातील विविध घटक आणि तज्ज्ञांना माध्यमविषयक प्रशिक्षण व इतर सेवा उपलब्ध करून देणे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर सहयोगी संघटनांच्या कार्याच्या योग्य प्रसिद्धीची व्यवस्था करणे.
विविध राष्ट्रीय परिचर्चांचे विषय, राज्यस्तरावरील महत्त्वाचे विषय, सामाजिक विषय, हिंदुत्व, भारतीय महापुरूष व तत्त्वज्ञान यांविषयी सकारात्मक मजकुराची निर्मिती करणे व त्याचे योग्य प्रचार व प्रसार करणे.
समविचारी व्यक्ती व संस्थांच्या नियमित व अविरत संपर्क व संवादातून एक सशक्त व समर्थ पारितंत्र चे निर्माण करणे.